‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकण्याची संधी

कोलकता। आजपासून(4 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.

या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहितने जर 15 षटकार मारले तर त्याला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्याची संधी आहे. रोहितने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 84 सामन्यात 89 षटकार मारले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गप्टील यांच्या नावावर विभागुन आहे. या दोघांनीही 103 षटकार मारले आहेत. तसेच आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 पेक्षा अधिक षटकारही या दोघांनीच मारले आहे.

रोहित सध्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तिसऱ्य़ा क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 91 षटकारांसह न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:

103 – ख्रिस गेल (56 सामने)

103 – मार्टीन गप्टील (75 सामने)

91 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)

89 – रोहित शर्मा (84 सामने)

83 – कॉलीन मुनरो (47 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

हा एकमेव विक्रम ‘रनमशिन’ विराट कोहलीला अशक्य…

…तर रोहित शर्मा बनणार धोनी, रैनानंतरचा असा पराक्रम करणारा तिसराच कर्णधार

२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती

ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर