चारच धावा केल्या तरी कर्णधार रोहित शर्माने केला हा खास विक्रम

चेन्नई। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(11 नोव्हेंबर) तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने एक खास विक्रम केला आहे.

रोहित या सामन्यात 4 धावांवर असतानाच बाद झाला. त्याला किमो पॉलने बाद केले. रोहितला या सामन्यात जास्त धावा करण्यात अपयश आले असले तरी मात्र त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

असा पराक्रम करणारा तो भारताचा 11 वा कर्णधार ठरला आहे. तसेच हा विक्रम त्याने कर्णधार म्हणून 20 वा सामना खेळताना केला आहे.

भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने 332 सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 46.89 च्या सरासरीने 11207 धावा केल्या आहेत.

विंडीज विरुद्धच्या या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे नेतृत्वाची धूरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. भारतानेही रोहितच्या नेतृत्वाखाली या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतासमोर 182 धावांची विजयासाठी लक्ष्य ठेवले आहे. विंडीजकडून निकोलास पूरनने 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर त्याला नाबाद 43 धावा करत डॅरेन ब्रावोने चांगली साथ दिली.

सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार :

11207 – एमएस धोनी

8190 – विराट कोहली

8095 – मोहम्मद अझरुद्दीन

7643 – सौरव गांगुली

4508 – सचिन तेंडुलकर

4394 – राहुल द्रवि़ड

4151 – सुनील गावस्कर

2928 – कपिल देव

2424 – नवाब पतौडी

1028 – दिलीप वेंगसकर

1001 – रोहित शर्मा

महत्त्वाच्या बातम्या:

महिला टी२० विश्वचषक: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे टीम इंडिया

ISL 2018: गोवा संघाच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा ब्लास्टर्सचा प्रयत्न

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १४- परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित