मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना

एडलेड येथे झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. यामुळे दोन्ही संघ प्रत्येकी एक सामने जिंकत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहे. तर यातील तिसरा सामना 18 जानेवारीला मेलबर्न येथे होणार आहे.

सध्या मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धाही सुरू आहे. यामध्ये स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालचा सामना पाहण्यास भारताचे रोहित शर्मा आणि दिेनेश कार्तिक पोहचले होते. यावेळी त्यांच्या सोबत विजय शकंरही होता. रोहितने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या सामन्याचा फोटो पोस्ट केला आहे.

18वे ग्रॅंडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशाने कोर्टवर उतरलेल्या नदालने हा सामन्यात अप्रतिम खेळ केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडनवर 6-3, 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतात परतल्यावर हार्दिक पंड्याने स्वत:ला घेतले एका रुममध्ये कोंडून

Video: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव

डाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…