रोहित शर्मा ठरला अजिंक्य रहाणेला वरचढ

केपटाऊन। आजपासून चालू झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेला ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला स्थान दिलेले आहे.

रोहित शर्माने मागच्या महिन्यात पार पडलेल्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत १ शतक तर दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याला या सामन्यात संधी मिळाली आहे.

परंतु त्याचाच मुंबईकर साथीदार रहाणेला मात्र उपकर्णधार असूनही संघाबाहेर बसावे लागले आहे. त्याने मागील काही सामन्यात हवी तशी कामगिरी केली नसल्याने त्याला हा फटका बसला आहे. रहाणेने श्रीलंका विरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत फक्त १६ धावा केल्या आहेत.

या दोघांच्या मागील काही सामन्यांमधील कामगिरीचा विचार करता आजच्या सामन्यात संधी मिळवण्यासाठी रोहित रहाणेवर वरचढ ठरला आहे.