४१वे अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी

दिल्ली। आज(13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात फिरोजशहा कोटला स्टेडियमवर पाचवा आणि शेवटचा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 273 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने 41 वे वनडे अर्धशतक करत चांगली सुरुवात केली आहे. याबरोबरच एक खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 46 वी धाव घेताच वनडेमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा टप्पा त्याने 200 व्या वनडे डावात गाठला आहे.

त्यामुळे रोहितने वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठण्याऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सौरव गांगुलीची बरोबरी केली आहे. गांगुलीनेही 200 वनडे डावात 8000 धावांचा टप्पा गाठला होता.

वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठण्याचा विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 175 डावात 8000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स आहे. त्याने हा टप्पा 182 डावात पूर्ण केला होता.

याआधी वनडेमध्ये 8000 धावांचा टप्पा 8 भारतीय खेळाडूंनी पार केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.

वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करणारे क्रिकेटपटू – 

175 डाव – विराट कोहली

182 डाव – एबी डिविलियर्स

200 डाव – सौरव गांगुली/ रोहित शर्मा

203 डाव – रॉस टेलर

210 डाव – सचिन तेंडुलकर

महत्त्वाच्या बातम्या –

‘सलामीवीर’ रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले अव्वल स्थान…

पंतप्रधान मोदींची धोनीला विनंती, कृपया एवढं काम करच

जेव्हा बाॅलीवूडचा महान अभिनेता सुनील शेट्टी देतो रिषभ पंतला जोरदार पाठींबा