पहिलीच ओव्हर मेडन खेळल्यानंतर रोहितने केले असे काही, ज्याचा कुणी विचारही केला नसेल

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने नाबाद शतक करताना विश्वविक्रम रचला आहे.

रोहितने या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. हे रोहितचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील चौथे शतक आहे.

निर्धाव षटक खेळल्यानंतर शतक करणारा पहिलाच खेळाडू-

या सामन्यातील पहिल्याच षटकात रोहितला एकही धाव काढता आली नव्हती. त्याला ओशान थाॅमसच्या या षटकात एकही धाव काढता आली नव्हती. परंतु यानंतर त्याने जबरदस्त अशी नाबाद १११ धावांची खेळी केवळ ६१ चेंडूत केली. यामुळे निर्धाव षटक खेळल्यानंतर त्याच टी२० सामन्यात शतकी खेळी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

यापुर्वी केवळ ब्रेंडन मॅक्क्युलमने अशी कामगिरी केली होती. परंतु तो निर्धाव षटकातील केवळ ४ चेंडू खेळला होता. २०१०मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात हा विक्रम झाला होता. तेव्हा ७व्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर दुसऱ्या चेंडूवर मार्टिन गप्टील बाद झाला होता. त्यानंतर पुढील ४ चेंडू मॅक्क्युलम खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

३९९८ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत न जमलेली गोष्ट रोहित शर्मा केवळ १ वर्षात करुन दाखवली

बापरे! एकाच ओव्हरमध्ये फलंदाजांनी कुटल्या चक्क ४३ धावा

धोनी, विराट नव्हे तर कर्णधार रोहित शर्माने केला आहे हा मोठा पराक्रम

म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम