- Advertisement -

दोन मुंबईकर, दोन अर्धशतके

0 111

बेंगळुरू । आज येथे सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी खणखणीत अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे ६६ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला तर रोहित ४८ चेंडूत ५५ धावांवर खेळत आहे.

या सामन्यात या मुंबईकर जोडीने १८.२ षटकांत १०६ धावांची चांगली सलामी दिली. अजिंक्यचे हे वनडेतील २२ वे अर्धशतक असून त्याने मागील दहा वनडेत त्याने ७ अर्धशतके केली आहेत. तर या मालिकेतील हे सलग तिसरे अर्धशतक आहे. सलामीवीर म्हणून अशी कामगिरी केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे.

रोहित शर्मानेही आज वनडेत ३४वे अर्धशतक झळकावले. यात त्याने १ चौकार आणि ५ षटकार खेचले. रोहितने आजपर्यंत बेंगलोरच्या मैदानावर तब्बल १९ वनडे षटकार मारले आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: