रैना, कोहलीनंतर हिटमॅन रोहित शर्मानेही केला तो खास विक्रम

दिल्ली। गुरुवारी(18 एप्रिल) आयपीएल2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात फिरोजशहा कोटला स्टेडीयमवर 34 वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 40 विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

त्याचबरोबर हा सामना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठीही खास ठरला आहे. त्याने या सामन्यात 22 चेंडूत 30 धावा केल्या. याबरोबरच त्याने ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात 8000 धावांचा टप्पाही पार केला आहे.

ट्वेंटी20 मध्ये हा टप्पा पार करणारा तो केवळ तिसरा भारतीय तर जगातील 8 वा खेळाडू ठरला आहे. याआधी सुरेश रैना आणि विराट कोहली या दोन भारतीय क्रिकेटपटूंनीच ट्वेंटी20 मध्ये 8000 धावांचा टप्पा पार केला होता.

रोहितचे आता ट्वेंटीमध्ये 307 सामन्यात 32.20 च्या सरासरीने 8018 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 6 शतकांचा आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत विराटने 260 सामन्यात 8183 धावा केल्या आहेत. तर रैनाने 311 सामन्यात 8216 धावा केल्या आहेत.

गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 168 धावा केल्या होत्या आणि दिल्ली कॅपिटल्स समोर 169 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 9 बाद 128 धावाच करता आल्या.

मुंबईने आत्तापर्यंत या आयपीएलच्या 12 व्या मोसमात 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे.

ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

12670 धावा – ख्रिस गेल (379 सामने)

9922 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (370 सामने)

9222 धावा – किरॉन पोलार्ड (468 सामने)

8701 धावा – शोएब मलिक (345 सामने)

8561 धावा – डेव्हिड वॉर्नर (267 सामने)

8216 धावा – सुरेश रैना (311 सामने)

8183 धावा – विराट कोहली (260 सामने)

8018 धावा – रोहित शर्मा (307 सामने)

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय

धोनीसारखा खेळाडू स्टंम्पमागे असल्याने मी नशीबवान आहे – विराट कोहली

विश्वचषक २०१९ साठी पाकिस्तानचा १५ जणांचा संघ जाहीर