षटकारांचा बादशहा रोहित हिटमॅन शर्माला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम करण्याची संधी

रविवार, 21 आॅक्टोबरपासून भारत विरुद्ध विंडिज संघात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. 2019 च्या विश्वचषकासाठी आता जवळ जवळ फक्त 7 महिने राहिले असल्याने या वनडे मालिकेला महत्त्व आले आहे.

त्यामुळे या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच या मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मालाही एक खास विक्रम करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीला मागे टाकण्याची संधी आहे.

रोहितने जर या मालिकेत 10 षटकार मारले तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.

सध्या तो या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने आत्तापर्यंत 188 सामन्यात 186 षटकार मारले आहेत. तसेच या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर 195 षटकारांसह सचिन तेंडुलकर तर तिसऱ्या क्रमांरावर 190 षटकारांसह सौरव गांगुली आहे.

त्याचबरोबर या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने आत्तापर्यंत 327 वनडे सामन्यात 217 षटकार मारले आहेत. तसेच तो वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. त्याने 398 सामन्यात 351 षटकार मारले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज-

217 – एमएस धोनी

195 – सचिन तेंडुलकर

190 – सौरव गांगुली

186 – रोहित शर्मा

155 – युवराज सिंग

महत्त्वाच्या बातम्या-

कॅच तर रोहित शर्माने अप्रतिम घेतला परंतु या कारणामुळे झाला मोठा वाद

दिग्गज खेळाडू म्हणतो, स्मिथ आणि वॉर्नरची ऑस्ट्रेलिया संघाला नितांत गरज आहे

कसोटीपाठोपाठ पृथ्वी शाॅची वनडेतही धमाकेदार खेळी, चौकार- षटकारांची बरसात