आणि रोहित शर्माने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडला

मोहाली । भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आज दुसऱ्या वनडेत खेळताना मोठा विक्रम आहे. त्याने आज वनडे कारकिर्दीतील १६वे शतक केले. हे करताना त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारले.

त्याने हा षटकार खेचताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम केला आहे. त्याने भारतात वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. भारतात झालेल्या वनडेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ७१ तर रोहित शर्माने ७२ षटकार खेचले आहे.

या यादीत अव्वल स्थानी माजी कॅप्टन कूल एमएस धोनी असून त्याने ११९ षटकार मारले आहेत.

वनडेत भारतात सर्वाधिक षटकार खेचणारे खेळाडू
११९- एमएस धोनी
७२- रोहित शर्मा
७१- सचिन तेंडुलकर
६५- युवराज सिंग
५८- सौरव गांगुली