रहाणे, एबी आणि सचिनबद्दल रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

भारतीय मर्यादीत षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माने शनिवारी ट्विटरवर आपला सध्याच्या काळातील आवडता फलंदाजासह अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

रोहितने काल ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी त्याला आवडता फलंदाज, सुट्टीसाठीचं आवडत ठिकाण, तसेच मास्टर ब्लास्टर सचिनबद्दल प्रश्न विचारले.

रोहितनेही सर्व प्रश्नांची यावेळी रोकठोक उत्तरे दिली.

यातील एक प्रश्न होता की तुला सध्याच्या काळातील कुणाची फलंदाजीची शैली आवडते? याचे उत्तर रोहितने मला एबी डिव्हिलीयर्स असे सांगतिले.

तसेच तुला अजिंक्य रहाणेची कोणती गोष्ट आवडते अशा प्रश्नावर त्याची केशरचना (हेअरस्टाईल) असे रोहितने सांगितले.

सचिनबद्दल एका शब्दांत सांग असे विचारले असता लेजंड (Legend) असा रिप्लाय रोहितने केला.

रोहितची आशिया कपसाठी कालच निवड झालेल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. नियमीत कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियात निवड झालेल्या 20 वर्षीय क्रिकेटपटूने मानले राहुल द्रविडचे आभार

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक