या कारणामुळे रोहित शर्मा आहे टी२० क्रिकेटचा सचिन

ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने  सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.

या सामन्यात रोहितने असे काही पराक्रम केले ज्यामुळे त्याला टी२०मधील सचिन म्हणायला हरकत नाही. यातील काही निवडक विक्रम-

-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर कसोटी (१५९२१) तसेच वनडे क्रिकेटमध्ये (१८४२६) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर रोहित शर्मा हा टी२०मध्ये सर्वाधिक धावा (२२८८) खेळाडू आहे. सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे.

-सचिन तेंडूलकर कसोटीत (५१) तसेच वनडेत (४९) सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे तर रोहित टी२०मध्ये सर्वाधिक शतके (४) करणारा खेळाडू आहे.

-सचिन तेंडूलकर वनडेत १०० षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तर रोहित टी२० क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू आज ठरला आहे.

महत्त्वाची बातमी-

या ५ विक्रमांमुळे रोहित शर्माच आहे टी२०मध्ये विराटपेक्षा मोठा खेळाडू

तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस

जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती

ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस