२६ धावा करताच या खास यादीत रोहित शर्मा टाकणार युवराज सिंगला मागे

पोर्ट ऑफ स्पेन।वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज (14 ऑगस्ट) पार पडणार आहे. क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणाऱ्या या सामन्याला भारतीय भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

या सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला 26 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला मागे टाकण्याची संधी आहे.

जर रोहितने आज 26 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तो युवराजला मागे टाकत 7 व्या क्रमांकावर येईल. तर जगातील एकूण फलंदाजांमध्ये रोहित 22 व्या क्रमांकावर येईल.

सध्या रोहितचे वनडे क्रिकेटमध्ये 217 सामन्यात 48.74 च्या सरासरीने 8676 धावा आहेत. तर युवराजने वनडे कारकिर्दीत 304 सामन्यात 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत.

वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 463 सामन्यात 18426 धावा केल्या आहेत.

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –

18426 धावा –  सचिन तेंडुलकर (463 सामने)

11406 धावा  – विराट कोहली (238 सामने)

11363 धावा – सौरव गांगुली (311 सामने)

10889 धावा – राहुल द्रविड (344 सामने)

10773 धावा – एमएस धोनी (350 सामने)

9378 धावा – मोहम्मद अझरुद्दीन (334 सामने)

8701 धावा – युवराज सिंग (304 सामने)

8676 धावा – रोहित शर्मा (217 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया

इंग्लंडला पराभूत करत टीम इंडिया ठरली चॅम्पियन!

या दिवशी होणार टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा