रोहित शर्माच्या मुलीचे नाव ठरले!

भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीकाला काही दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यांच्या नवजात मुलीचे नाव त्यांनी समायरा असे ठेवले आहे. याबद्दल रोहितने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

त्याने सोशल मीडियावर पत्नी रितीकासह त्याच्या मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला कॅप्शन देताना त्याने त्यांच्या मुलीचे नाव समायरा ठेवले असल्याचे सांगितले आहे.

रोहित जेव्हा मुलगी झाल्याचे कळाले तेव्हा तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. पण तो 30 डिसेंबरला त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटण्यासाठी पुन्हा भारतात परतला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले आहे.

तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुन्हा भारतीय संघात 8 जानेवारीला सहभागी होणार आहे.

रोहितने याआधीही दोन दिवसांपूर्वी त्याच्या मुलीने त्याचे बोट धरल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या बाबतीत ती गोष्ट कधीच नाही घडली

३३ वर्षांनंतर थायलंडवर विजय मिळवण्यास टीम इंडिया उत्सुक

कोहलीच्या टीम इंडियाने सहाव्यांदा दिला विरोधी संघाला फॉलोऑन, काय आहे याआधीचा इतिहास?

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर