हे आहे रोहित शर्माचे आवडते द्विशतक !

मोहाली।आज भारतीय सलामीवीरआणि कर्णधार रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजी करत द्विशतकी खेळी केली. ही कामगिरी करताना त्याने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक केले.

सामना संपल्यावर जेव्हा क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी रोहितला विचारले की तुझे आवडते द्विशतक कोणते, तेव्हा रोहितने उत्तर द्यायला थोडी टाळाटाळ केली. परंतु पुन्हा मांजरेकर यांनी विचारल्यावर रोहितने २६४ असे सांगितले.

परंतु पुन्हा स्पष्टीकरण देताना रोहित म्हणाला, ” मला माझ्या द्विशतकांची तुलना करायला आवडत नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध जेव्हा मी २०९ धावा केल्या तेव्हा तो सामना हा मालिकेचा निकाल ठरवणार होता. जेव्हा श्रीलंकासंघाविरुद्ध २६४ धावा केल्या तेव्हा मी ३ महिन्यानंतर संघात पुनरागमन केले होते तर ह्या मालिकेची सुरुवात खूप खराब झाली त्यामुळे मालिकेत परतण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यामुळे तिन्ही द्विशतके खास आहेत. “

रोहित हा वनडेत तीनवेळा द्विशतक करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे.