आणि रोहित शर्माने मोडला सचिनचा रेकॉर्ड

इंदोर । भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम मोडला आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

रोहितने आज या सामन्यात दोन षटकार खेचले. हे दोन षटकार खेचताच तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिला आला.

मास्टर ब्लास्टर सचिन आणि ऑस्ट्रेलियाचे नाते काही खास होते. सचिनने या संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तब्बल ६० षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेचले होते. रोहित शर्माच्या नावावर आता ६२ षटकार आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
६२* रोहित शर्मा
६१ ब्रॅंडोन मॅक्कुलम
६० सचिन तेंडुलकर
५३ ख्रिस गेल