शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने विव रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात काल (१२ जानेवारी) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतक केले आहे.

त्याने १२९ चेंडूत १३३ धावा केल्या. या खेळीत त्याने १० चौकार आणि ६ षटकार मारले आहेत. त्याला मार्कस स्टॉयनिसने बाद केले. रोहितचे हे ऑस्ट्रेलिया विरुद्धचे ७ वे वनडे शतक ठरले आहे. यातील ४ शतके त्याने ऑस्ट्रेलियामध्ये तर ३ शतके भारतात केली आहेत.

हे शतक करताना रोहितने विंडीजचे दिग्गज विव रिचर्ड्स यांचा एक विक्रम मोडला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन भूमीत वन-डे मध्ये ३ शतके केली आहेत. त्यांनी ३८ डावांमध्ये ही शतके केली होती. तर रोहितने १७ डावांमध्ये ही ४ शतके केली आहे.

त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियन भूमीत सर्वाधिक वनडे शतके करण्याच्या यादीत रोहित अव्वल क्रमांकावर आला आहे. मात्र रोहितच्या या चारही शतकांचे सामने भारताने गमावले आहेत.

तसेच कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ शतके केली आहेत . त्यातील २ शतके त्याने ऑस्ट्रेलियामध्ये केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मा शिकतोय शिखर धवनच्या मुलीकडून डान्स, पहा व्हिडिओ

त्या एका चेंडूमुळे भारताला सिडनी सामना गमवावा लागला…

विश्वचषक गाजवलेल्या खेळाडूला मिळाले न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान