हिटमॅन रोहित शर्माचा वानखेडेवर विक्रमांचा विक्रम

मुंबई । आज आयपीएल 2018 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने आज एक खास विक्रम केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाबरोबर अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

रोहितने आयपीएलमध्ये १६३ सामने खेळले असून सुरेश रैनानेही १६३ सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीचे १६२ सामने झाले असून त्यांचा पुढील सामना २० एप्रिलला असल्यामूळे तुर्तास धोनीला या विक्रमासाठी वाट पहावी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान चेन्नईचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाला पायाच्या पोटरीमध्ये क्रॅम्प आला होता. त्यामुळे त्याला या सामन्यात धावा करताना त्रास होत होता.त्यामुळे रैनाला पुढील दोन सामन्यांना म्हणजेच १५ एप्रिलला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या आणि २० एप्रिलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यांना मुकावे लागले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-

१६३- सुरेश रैना

१६३- रोहित शर्मा

१६२- एमएस धोनी

१५६- दिनेश कार्तिक

१५३- राॅबीन उथप्पा

१५२- युसूफ पठाण / गौतम गंभीर / विराट कोहली