Video: असे हातवारे करून रोहितने केले धोनीला फलंदाजीसाठी पाचारण

0 517

इंदोर। भारत विरुद्ध श्रीलंका संघात काल पार पडलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारतच्या विजयाची आणि रोहित शर्माच्या शतकाची जशी चर्चा झाली तशीच अजून एका गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे ज्या प्रकारे रोहितने बाद झाल्यावर हातवारे करून एम एस धोनीला फलंदाजीसाठी पाचारण केले त्याची. याचा व्हिडीओ ही सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.

रोहित काल १३ व्या षटकात ४३ चेंडूत ११८ धावा करून झेलबाद झाला तेव्हा प्रशिक्षक रवी शास्त्रींनीं ड्रेसिंग रूममधून कोणाला फलंदाजीसाठी पाठवायचं असे रोहितला विचारले. तेव्हा रोहितने यष्टिरक्षक जसा उभा असतो तसा अभिनय करून धोनीला फलंदाजीला पाठवा असे सुचवले. धोनीला काल तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.

कालच्या सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने ३५ चेंडूंतच त्याचे शतक पूर्ण केले होते. तसेच काल धोनीनेही यावर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

भारताने या सामन्यात श्रीलंकेवर ८८ धावांनी विजय मिळवून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: