रोहित शर्माने विराट कोहलीला केले सोशल मिडियावर अनफॉलो; चाहत्यांची वाढली चिंता

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात दरी निर्माण झाल्याचे रोहितच्या काही कृतींमधून दिसून आले आहे.

रोहितने विराटला ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मिडिया पेजेसवरुन अनफॉलो केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे. तसेच या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असेल अशीही आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री जेव्हा भारतीय संघाबरोबर लंडन येथील भारतीय दुतावासात गेली होती, तेव्हा बीसीसीआयच्या दुहेरी वागण्यावरही प्रश्न उपस्थित केलेल्या एका ट्विटलाही रोहितने लाइक केले होते.

ही घटना सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान झाली होती. पहिल्या तीन कसोटीदरम्यान खेळाडूंना पत्नी किंवा प्रेयसी यांना भेटण्यास परवानगी नव्हती. तसेच त्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी खेळाडूंना भेटण्याची परवानगी होती.

परंतू नंतर रोहितने या ट्विटला पुन्हा डिसलाइक केले आहे.

Screengrab: twitter/ImRo45

फक्त एवढेच नाही तर वनडेत तीन द्विशतके करणाऱ्या रोहितने तो भारताच्या कसोटी संघात असायला हवा होता, असा आशय असणारेही ट्विट लाइक केले आहे.

रोहितची नुकतीच 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी भारताचा प्रभारी कर्णधार म्हणून निवड झाली आहे. या स्पर्धदरम्यान विराटला विश्रांती देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप

Video: यष्टीरक्षक इशान किशनची एमएस धोनी स्टाईल किपिंग

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती