रोहित शर्मा’कडून ‘इंजिनीअर्स डे’च्या खास शुभेच्छा !

चेन्नई । भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खास अंदाजात इंजिनीअर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यासाठी रोहित चेन्नई शहरात आला आहे.

आपल्या ट्विटच्या माध्यमातून ह्या शुभेच्छा देताना रोहित म्हणतो, ” एखाद्या देशाच्या पायाभूत सुविधा त्या देशाची प्रतिमा बनवतात. ज्या अभियंत्यांनी हा देश घडवला आहे त्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा. !”

रोहितचे स्वतःचे शिक्षण हे १२वी पर्यंतचे असूनही तो शुभेच्छा देण्यासाठी चुकत नाही ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये आर अश्विन हा माहिती तंत्रज्ञान अभियंता तर अक्सर पटेल हा अष्टपैलू खेळाडू धर्मसिंह देसाई विद्यापीठ, गुजरात येथून मेकॅनिकल इंजिनीरिंग आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.