रोहित शर्माने विराटला दिल्या हटके शुभेच्छा !

सर्वांना उत्सुकता असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न अखेर काल पार पडले. त्यांनी इटली मध्ये कुटूंब आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडला.

विराट अनुष्काने त्यांच्या आयुष्यातील ही महत्वाची बातमी अखेर सोशल मीडियाचा आधार घेत सर्वांपर्यंत पोहचवली. त्यांना त्यांच्या लग्नानिमित्त अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने विराट आणि अनुष्काला ट्विटरवरून खास हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने अनुष्काला एक खास सल्ला पण दिला आहे. त्याने म्हटले आहे की, ” विराट अनुष्का तुम्हाला शुभेच्छा. विराट मी तुला हजबंड हँडबुक देईल. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस”

रोहितचेही आडनाव शर्मा असल्याने त्याने अनुष्कालाही शर्मा हे नाव बदलू नकोस असा गमतीत सल्ला दिला आहे. सध्या रोहित श्रीलंका विरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. विराटने या मालिकेतून विश्रांती घेतली असल्याने रोहितवर कर्णधार पदाची जबाबदारी आहे.