गुहाटीमध्ये रोहित शर्माने पारंपरिक पगडी घालण्यास दिला नकार !

त्यानंतर भारताचा माझी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ती पगडी घेतील आणि डोक्यावर परिधानही केली.

गुवाहाटी । भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या टी२० सामन्यासाठी काल गुवाहाटी शहरात दाखल झाला. या वेळी आसाम राज्यातील या शहरात भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागताचाच एक भाग म्हणून आसामची पगडी भारतीय संघातील खेळाडूंना घालण्यात येत होती. पण रोहित शर्माने ती पगडी घालण्यास साफ नकार दिला.

गुवाहाटीमध्ये भारतीय संघ जेव्हा विमानातून उतरला तेव्हा बसपर्यंत चालत जाताना चाहत्यांनी संघासाठी आसामची खास पगडी आणली होती. तेव्हा भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आपल्या पत्नीबरोबर चालत येत असताना त्याने त्या चाहत्याला पगडी घालण्यास नकार दिला आणि त्याला चकवून पुढे निघून गेला.

त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ती पगडी घेतील आणि डोक्यावर परिधानही केली.

तर मनीष पांडेने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ती पगडी घालून स्वतःचा एक फोटो ही शेयर केला आहे.

७ वर्षांनंतर या शहरात आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. दोन्ही संघातील खेळाडूंचे काल जेव्हा विमानतळावर आगमन झाले तेव्हा मोठ्या प्रमाणावर चाहते उपस्थित होते. विमानतळावर चाहते इंडिया इंडिया अशा जोरदार घोषणा देत होते.