फिफा बेस्ट प्लेअर पुरस्कार – कोण ठरणार वरचढ मेस्सी, नेमार की रोनाल्डो

फुटबॉल विश्वातील सध्याचे तीन सर्वात लोकप्रिय खेळाडू लियोनला मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेमार जुनियर पुन्हा एकमेकांसमोर उभे असणार आहेत. या वेळी ते एखाद्या सामन्यासाठी नसून ते फिफाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी. हा पुरस्कार या तीन खेळाडूंपैकी एकाला मिळणार आहे. हा पुरास्कार २३ ऑक्टोबर रोजी लंडन येथे जाहीर करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी प्रथमता २५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यातून निवडून या तीन खेळाडूंना अंतिम केले आहे. काही वर्षांपासून फिफाने हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. त्या अगोदर बालोन दोर पुरस्कार हा फिफाचा पुरस्कार समजला जायचा. बालोन दोर हा पुरस्कार फ्रान्स आणि फिफा त्यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जायचा.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

# २०१० पर्यंत स्वतंत्रपणे फिफा बेस्ट प्लेअर अवॉर्ड दिला जात होता. त्यानंतर २०१० ते २०१५ मध्ये हा पुरस्कार बालोन दोर पुरस्कारामध्येच एकत्र करून दिला जायचा. त्याला ‘फिफा बालोन दोर’ पुरस्कार म्हटले जायचे. २०१६ पासून हा पुरस्कार पुन्हा फिफा बेस्ट प्लेअर अवॉर्ड म्हणून दिला जातो आहे.

# या पुरस्कारासाठी मतदान घेतले जाते. यात प्रत्येक राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या कर्णधाराला मतदान करता येते. प्रत्येक संघाचे प्रशिक्षक आणि काही मोजके पत्रकार यामध्ये मतदान करतात. फिफाच्या वेबसाईटमध्ये रजिस्टर असणाऱ्या काही फुटबॉल प्रेमींना देखील मतदान करता येते.

# रोनाल्डोला हा पुरस्कार मागच्या वर्षी मिळाला होता.