संघात दारू पिण्याची संस्कृती नसल्याचा ह्या खेळाडूकडून दावा

इंग्लंड संघ आज ऍशेस २०१७ साठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आज रवाना झाला. संघ रवानाहोण्यापूर्वी बोलताना कर्णधार जो रूटने इंग्लंड संघात कोणतेही ड्रिंकिंग कल्चर अर्थात दारू पिण्याची संस्कृती नसल्याचे म्हटले आहे.

ऍशेस २०१७ मालिकेला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड संघ उपकर्णधार बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळणार आहे. गेल्या महिन्यात ब्रिस्टॉल शहरात एका पबबाहेर बेन स्टोक्सने एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा विडिओही एका वाहिनीने प्रसिद्ध केला होता. याच पार्श्वभूमीवर रूटला हा प्रश्न विचारण्यात आला होता.

“मला नाही वाटत की ड्रिंकिंग कल्चर दारू पिण्याची संस्कृती आमच्या संघात आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण काळजी घेऊन बेन स्टोक्सचे ब्रिस्टॉलमध्ये जे प्रकरण झाले तस परत न होण्याची काळजी घेऊ. ” असे इंग्लंडचा कर्णधार म्हणाला.

” आम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून वाढलो आहोत आणि आम्हाला माहित आहे की आम्हाला या दौऱ्यात कसे वागायचे आहेत. “