रॉस टेलरने केले हे खास विक्रम

0 251

आज न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध माजी कर्णधार रॉस टेलरच्या शतकी खेळीच्या जोरावर ३ विकेट्सने विजय मिळवला. रॉस टेलरने या शतकाबरोबरच खास विक्रमालाही गवसणी घातली आहे.

आज टेलरने ११६ चेंडूत १२ चौकारांच्या साहाय्याने ११३ धावा केल्या आणि वनडे कारकिर्दीतील १८ वे शतक झळकावले. याबरोबरच आज टेलरने वनडे कारकिर्दीत ७००० धावांचा टप्पाही पार केला आहे.

हा टप्पा पार करणारा तो न्यूझीलंडचा तिसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी नॅथन ऍस्टल आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी न्यूझीलंडकडून खेळताना वनडे मध्ये ७००० धावांचा टप्पा पार केला आहे.

टेलरने आजपर्यंत २०२ वनडे सामने खेळले असून १८ शतके आणि ४१ अर्धशतकांसह ४५.३५ च्या सरासरीने ७०७६ धावा केल्या आहेत. तसेच टेलर न्यूझीलंडचा सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याने आज १८८ व्या वनडे डावात त्याचे १८ वे शतक केले आहे.

टेलर मागील काही सामन्यात धावा करण्यासाठी संघर्ष करत होता. अखेर आज त्याला इंग्लंडविरुद्ध फॉर्म सापडला. टेलरची इंग्लंड विरुद्धची कामगिरी नेहेमीच चांगली राहिली आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना मागील ७ वनडे डावांमध्ये ३ शतके केली आहेत.

तसेच त्याने इंग्लडविरुद्ध ३१ वनडे सामन्यात ४ शतके आणि ५ अर्धशतकांसह ११९० धावा केल्या आहेत. याबरोबरच टेलर न्यूझीलंडचा इंग्लडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: