न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने आयपीएलबद्दल केले मोठे भाष्य

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज रॉस टेलरने म्हटले आहे की न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना आयपीएल खेळण्याचा मोठा फायदा झाला आहे. त्याने म्हटले आहे की या स्पर्धेमुळे जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंबरोबर खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी खेळाडूंना मिळते.

न्यूझीलंड संघाबरोबर श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या टेलरने कोलंबोमधून पीटीआयला सांगितले की ‘मी भाग्यशाली आहे की मला काही संघाकडून आणि सर्वोत्तम खेळाडूंबरोबर (आयपीएलमध्ये) खेळण्याची संधी मिळाली. मला वाटते, तिथे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि काही अन्य संघांचा प्रभाव राहिला आहे.’

‘मला वाटते आयपीएलने खेळाडूंमधील अंतर कमी करण्यात न्यूझीलंड क्रिकेटला मदत केली आहे.’

‘एकादा तूम्ही या खेळाडूंना ओळखायला लागला की तूम्ही त्यांची क्रिकेटची समजही जाणून घेता आणि तूम्ही त्यांना सराव करतानाही पाहता आणि याची न्यूझीलंड क्रिकेटला मोठी मदत झाली आहे.’

न्यूझीलंडचा माजी कर्णधार टेलरने पुढे म्हटले, ‘जे खेळाडू तिथे खेळले आहेत आणि पुढील वर्षांमध्ये खेळणार आहेत त्यांना जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याचा फायदा मिळणार आहे.’

टेलरने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलमध्ये 55 सामने खेळताना 25.42 च्या सरासरीने 1017 धावा केल्या आहेत.

तसेच 14 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेविषयी टेलर म्हणाला, ‘श्रीलंकेला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळाले. ते या परिस्थितीत चांगले खेळतात. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात हरवल्यानंतर श्रीलंकेचा आत्मविश्वास वाढला असेल.

‘ते सुद्धा आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप खेळण्यासाठी उतरणार आहेत. कसोटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळणे कठीण आहे.’

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात होणारी 2 सामन्यांच्या कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सुरेश रैनाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया; इतक्या दिवसांसाठी राहणार क्रिकेटपासून लांब

व्हिडिओ: विजय शंकरचे दुखापतीनंतर धमाकेदार पुनरागमन; पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट

भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या ठिकाणात बदल; पुण्यात होणार हा सामना