इंग्लंड संघाला मोठा धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू पडला दोन सामन्यांतून बाहेर

2019 विश्वचषकात आज(18 जून) इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय अफगाणिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या आगामी सामन्यांतून बाहेर पडला आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.

ही दुखापत त्याला विंडीज विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झाली आहे. तो या सामन्यात ही दुखापत झाल्यानंतर लगेचच मैदानातून बाहेर गेला होता. तसेच नंतर फलंदाजीसाठीही तो आला नाही. त्याच्या जागेवर जो रुटने जॉनी बेअरस्टो बरोबर सलामीला फलंदाजी केली होती.

रॉयचे शनिवारी स्कॅन करण्यात आले आहे. यामध्ये त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला आता पुढील निदान दोन सामने तरी संघाबाहेर बसावे लागणार आहे.

रॉय या विश्वचषकात चांगल्या लयीत खेळत असून त्याने आत्तापर्यंत फलंदाजी केलेल्या तीन सामन्यात मिळून 215 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

रॉय बरोबरच इंग्लंड समोर कर्णधार इयान मॉर्गनच्या दुखापतीचीही समस्या आहे. मॉर्गनही विंडीज विरुद्धच्या सामन्यात पाठदुखीमुळे मैदानाबाहेर गेला होता. त्याचेही स्कॅन करण्यात आले असून पुढील उपचारही करण्यात आले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्मा म्हणतो, हा खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, पहा व्हिडिओ

विंडीज विरुद्ध शतक करणाऱ्या शाकिबने दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना मागे टाकत रचला विश्वविक्रम

तो खेळाडू सर्फराज अहमदला म्हणाला ‘ब्रेनलेस कॅप्टन’