विराटला लग्नाची विचारणा करणारी डॅनियल वॅट आरसीबीच्या सामन्यांना लावणार हजेरी!

इंग्लंड महिला संघातील स्टार खेळाडू डॅनियल वॅट अायपीएल २०१८च्या सामन्यांना हजेरी लावू शकते. ती खासकरून राॅयल चॅलेंजर बेंगलोरच्या सामन्यांना त्यातही विराटची कामगिरी पहायला अतूर असल्याच तिच्या ट्वीटवरून कळते. 

अायपीएल सुरू असेल तेव्हा डॅनियल वॅट तिरंगी मालिकेसाठी भारतात असेल. ही तिरंगी मालिका आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत देशात होणार आहे. 

एका चाहत्याने तिला ट्वीटरवर विचारले होते की ‘तू विराटची पत्नी अनुष्कासोबत राॅयल चॅलेंजर बेंगलोरच्या सामन्याच्या वेळी विराटला मैदानावर जावून पाठींबा देणार आहेस का?’

तेव्हा भारतीय भूमीतच वनडे आणि टी२० पदार्पण करणाऱ्या डॅनियल वॅट “मी नक्की प्रयत्न करेल आणि सामन्याला हजेरी लावेल’ असं  म्हटलं आहे. 

यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर…
डॅनियल वॅट ही इंग्लिश क्रिकेटर असून या २६ वर्षीय खेळाडूने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण २०१० साली भारताविरुद्ध मुंबई शहरात केले आहे. या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंड कडून ५३ वनडे आणि ७३ टी२० सामने खेळले आहेत.

अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू असलेल्या डॅनियलने ४ एप्रिल २०१४ रोजी विराटला लग्नाची मागणी घातली होती. हे दोनही खेळाडू चांगले मित्र आहेत. २०१४ मध्ये जेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला तेव्हा डॅनियल वॅट आणि विराट कोहली भेटले होते. तेव्हा विराटने तिला स्वतःची बॅट गिफ्ट केली होती.