IPL 2018: आज राजस्थान-हैद्राबाद आमने-सामने

जयपूर। आयपीएलमधील आजचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद असा होणार आहे. हा सामना जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये दुपारी 4.०० वाजता सुरु होईल.

राजस्थान 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मैदानात उतरणार आहे. या संघाने 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यांत विजय नोदंवला आहे तर 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील सामन्यात त्यांनी मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला होता.

हैद्राबादने 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. मागील दोन सामन्यांत त्यांनी  भुवनेश्वर कुमार आणि बिली स्टानलेक यांच्या अनुपस्थितीत 118 आणि 132 या दिलेल्या लक्ष्याचा चांगलाच बचाव केला होता. यावरूनच त्यांची गोलंदाजी किती मजबूत आहे हे दिसून येते. मात्र फंलदाजीत या संघाचे तीनतेरा वाजले आहेत.

फंलदाजीत कर्णधार केन विल्यमसन, मनिष पांडे आणि शिखर धवन सोडून बाकीचे खेळाडू चमकले नाही. राशिद खान (7 सामन्यात 9 विकेट्स) आणि शाकिब अल हसन( 7 सामन्यात 8 विकेट्स आणि 117 धावा ) यांनी अशी कामगिरी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

राजस्थानकडून फंलदाजीत संजू सॅमसन ( 6सामने 239 धावा ), अजिंक्य राहणे (6 सामन्यात 160 धावा ) यांना जॉस बटलर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी साथ दिली आहे. गोलंदाजीची धूरा श्रेयश गोपाळ, कृष्णप्पा गॉथम, जयदेव उनाडकट आणि बेन लाफ्लिन यांच्यावर आहे.

या मोसमात हे दोन संघ 9 एप्रिलला हैद्राबाद येथे आमने-सामने आले होते. त्या सामन्यात हैद्राबादने राजस्थानला 9 विकेट्सने पराभूत केले होते. तर या पराभवाचा बदला आज राजस्थान घेणार का ? हे पहावे लागेल.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना?
राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा 28 वा सामना आज, 29 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील सामना?
राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील आजचा सामना सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे होईल.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना?
आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना आज दुपारी 4.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक दुपारी 3.30 वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

राजस्थान रॉयल्स: अजिंक्य राहणे (कर्णधार), बेन स्टोक्स,स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डार्सी शॉर्ट, जोफ्रा आर्चर, प्रशांत चोप्रा , कृष्णप्पा गॉथम, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अनुरीत सिंग, बेन लाफ्लिन, दुशमंथा चामीरा , अंकित शर्मा, अर्यमान बिर्ला , श्रेयश गोपाळ, सुधेसन मिधून, महिपाल लोमरोर, जतीन सक्सेना, हेनरीच क्लासेन

सनरायजर्स हैद्राबाद: केन विल्यमसन ( कर्णधार ), शिखर धवन, वृद्धीमान साहा, मनिष पांडे, शाकिब अल हसन, दिपक हुडा, भुवनेश्वर कुमार, युसुफ पठाण, राशिद खान, सिध्दार्थ कौल, ख्रिस जॉर्डन, तन्मय अग्रवाल, खलिल अहमद, बसिल थम्पी, रिकी भुई, बिपूल शर्मा, कार्लोस ब्रेथवेट, श्रीवत्स गोस्वामी, अलेक्स हेल्स, मेहेदी हसन, मोहम्मद नबी, टी नटराजन, सचिन बेबी, संदिप शर्मा, बिली स्टानलेक

 

महत्त्वाच्या बातम्या –

‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने केला हा खास विक्रम

एकवेळ फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला तो गोलंदाज आज पाकिस्तान संघात जागा मिळण्यासाठी झगडतोय

1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल

महाराष्ट्राची स्म्रिती मानधना आशिया कपसाठी भारताची उपकर्णधार तर मुंबईकर जेमिमाचाही संघात समावेश

मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?