फिफा विश्वचषक: ऐनवेळी या संघाचे प्रशिक्षक बदलले

मॉस्को। स्पेन संघाचे प्रशिक्षक जुलेन लोपेतेग्युईला यांना पदावरून हटवण्यात आले आहे. स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनला न विचारता त्यांनी रियल माद्रिदच्या प्रशिक्षक पदाची भुमिका स्वीकारली.

14 जूनपासून सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषकातील स्पेनचा पहिला सामना 15 जूनला पोर्तुगल बरोबर आहे.

द स्पॅनिश फुटबॉल फेडरेशन (आरएफइएफ)चे अध्यक्ष लुईस रुबीलियस यांनी हा निर्णय घेतला. यामुळेच असोसिएशनने लोपेतेग्युई यांचा करार संपुष्टात आणला.

तसेच रुबीलियस यांनी फर्नांडो हिएरो यांची संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

हिएरो यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा फारसा अनुभव नाही. त्यांनी फेडरेशन कपमध्ये रियल ओव्हेदे या संघाचे फक्त एका वर्षासाठी प्रशिक्षकपद सांभाळले होते.

लोपेतेग्युई यांची झिनेडाईन झिडने यांच्या निवृत्तीनंतर रियल माद्रिदचे नवा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी रियल बरोबर तीन वर्षाचा करारही केला आहे.

आताच लोपेतेग्युई यांचा राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाचा करार 2020 पर्यंत वाढवण्यात आला होता. लोपेतेग्युई हे 2016 मध्ये स्पेनचे मॅनेजर बनले. त्यांच्याआधी व्हिसेंटे डेल बॉस्क हे संघाचे मॅनेजर होते.

स्पेन लोपेतेग्युई यांच्या प्रशिक्षणाखाली स्पेन 20 पैकी 14 सामने जिंकला आहे. बाकीचे सहा सामने अनिर्णीत राहिले.

लोपेतेग्युई यांनी घेतलेल्या निर्णयावर रुबीलियस म्हणाले,”मी खेळाडूंसोबत चर्चा केली ते नविन प्रशिक्षकाखाली सराव करण्यास तयार आहे.”

” मी लोपेतेग्युई यांचा सन्मान करतो पण यावेळी ते चुकीचे आहेत. स्पर्धेला काहीच वेळ शिल्लक असताना लोपेतेग्युईने असे केले. आम्हांला न सांगता महत्त्वाच्या वेळी तुम्ही असे निर्णयच कसे घेऊ शकता”,असेही ते म्हणाले.