नवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार

वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय अ संघाने रविवारी(21 जूलै) वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला आहे. या वनडे मालिकेतील रविवारी पार पडलेल्या पाचव्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने 89 चेंडूत 99 धावांची अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याचे शतक केवळ 1 धावेने हुकले. त्याला 99 धावांवर किमो पॉलने बाद केले.

तसेच त्याने या सामन्यात वेस्ट इंडीजने दिलेल्या 237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलबरोबर 110 धावांची सलामी भागीदारीही रचत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली होती.

तसेच गिल 69 धावांवर बाद झाल्यानंतर त्याने श्रेयस अय्यरबरोबर 112 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. अय्यरने नाबाद 61 धावा केल्या.

विशेष म्हणजे ऋतुराजने भारत अ संघाकडून खेळलेल्या मागील 8 डावात सहाव्यांदा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या रविवारी पार पडलेल्या या वनडे मालिकेतील ऋतुराजचे हे दुसरे अर्धशतक आहे. त्याने वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 85 धावांची खेळी केली होती. या वनडे मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 51.75 च्या सरासरीने 4 सामन्यात 207 धावा केल्या आहेत.

तसेच तो वेस्ट इंडीज अ विरुद्ध खेळण्याआधी जूनमध्ये श्रीलंका अ विरुद्धच्या वनडे मालिकेतही भारत अ संघाकडून खेळला होता. त्याने या वनडे मालिकेतही शानदार कामगिरी करताना 2 शतके आणि 2 अर्धशतके करत 4 डावात मिळून 235 च्या सरासरीने 470 धावा केल्या आहेत. तो या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

पुण्याच्या असणाऱ्या ऋतुराजने श्रीलंका अ आणि वेस्ट इंडीज अ विरुद्धच्या मालिकेत मिळून 8 डावात अनुक्रमे 187*, 125*, 84, 74, 3, 85, 20, 99 अशा धावा करताना एकूण 112.83 च्या सरासरीने 677 धावा केल्या आहेत. ऋतुराजने त्याच्या या शानदार कामगिरीमुळे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान

१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

विश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही