स्म्रीती मानधनाच्या यशात कर्णधार विराट कोहलीचा मोठा वाटा

विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये संघर्ष करत असताना भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्म्रीती मानधना मात्र किया सुरपर लीग गाजवात अाहे.

सध्या सुरु असेल्या किया सुपर लीगमध्ये स्म्रीती मानधनाने तुफान फटाकेबाजी करत 6 सामन्यात 85 च्या सरासरीने 338 धावा केल्या आहेत.

तीच्या या तुफान फॉर्मबाबत पत्रकारांशी बोलताना स्म्रीतीने तीच्या या यशात भारताचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि पुरुष संघातील इतर खेळाडूंचेही योगदान आहे असे सांगितले.

“मला आणि संघातील इतर खेळाडूंनाही विराट, शिखर आणि बाकिचे खेळाडूही वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनेचा मला कायमच फायदा झाला आहे.” असे स्म्रीती म्हणाली.

“गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर मी माझ्या फलंदाजीवर आणि फिटनेसवर जास्त भर देत सातत्यपूर्ण सराव केला. त्यामुळेच मी आज इथे यश मिळवू शकले.” असे स्म्रीती म्हणाली.

नोव्हेंबर महिन्यात विंडीज येथे होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकापर्यंत स्म्रीतीचा फॉर्म असाच राहिला भारतीय संघाला याचा नक्कीच लाभ होणार आहे.

स्म्रीती या लीगमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असून ती यावर्षी या लीगमधील आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तिने आत्तापर्यंत 6 सामन्यात अनुक्रमे 48, 37, 52*, 43*, 102 आणि 56 अशा मिळूण 338 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे ती वेस्टर्न स्ट्रोमकडून एका मोसमात सर्वाधिक धावा करणारीही फलंदाज ठरली आहे. या आधी 2016 मध्ये स्टीफनी टेलरने तर 2017 मध्ये रचेल प्रीस्टने वेस्टर्न स्ट्रोमकडून अनुक्रमे सर्वाधिक 289 आणि 261 धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात

ड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ