केरळ क्रिकेट असोशिएशनचे बीसीसीआयला पत्र, श्रीशांतचा निर्णय लवकर घ्यावा !

कोची : चार वर्ष कोणत्याही प्रकारचं क्रिकेट न शकलेल्या श्रीशांतला आता पुनरागमनचे वेध लागले आहे, परंतु मुख्य अडथळा आहे बीसीसीआय. म्हणूनच केरळ क्रिकेट असोशिएशनने बीसीसीआयला पत्र लिहून लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

केरळ क्रिकेट असोशिएशनने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, ” सद्धया देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुकले केसीए श्रीशांतला सराव शिबिरात भाग घेऊ देऊ इच्छिते. परंतु हे सर्व बीसीसीआय आणि सीओए यांच्या परवानगी शिवाय अशक्य आहे. ”

सोमवारी केरळ हायकोर्टने श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवली. हायकोर्टने आपल्या निकालात म्हटले आहे की श्रीशांतविरुद्ध असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

श्रीशांत भारताकडून २७ कसोटी, ५३ एकदिवसीय सामने आणि १० टी२० खेळला आहे. विशेष म्हणजे विश्वविजेत्या भारतीय टी२० तसेच ५० षटकांच्या संघाचा तो भाग होता.