भारतासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी २८७ धावांचे लक्ष 

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर जिंकण्यासाठी धावांचे लक्ष ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ९१.३ षटकांत २५८ धावांवर संपुष्ठात आला. 

दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलिअर्सने ८०, डीन एल्गारने ६१, फाफ डुप्लेसीने ४८ तर फिलँडरने २६ धावा केल्या. भारताकडून मोहमंद शमीने ४, जसप्रीत बुमराहने ३, इशांत शर्माने २ तर आर अश्विनने १ विकेट घेतली. 

सामन्याचा आज चौथा दिवस असून आजच्या दिवसातील ३५ षटकांचा खेळ बाकी आहे. 

दक्षिण आफ्रिकेत २५० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून ५ वेळा पाहुणा संघ विजयी बनला आहे. हे सर्व विजय ऑस्ट्रेलिया संघाने मिळवले आहेत. आशियातील संघाने दक्षिण आफ्रिकेत आजपर्यंत केवळ १९१ हेच लक्ष पार केले असून २००७मध्ये पाकिस्तानने ही कामगिरी केली होती.