दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष आणि महिला संघाने मिळून केल्या टीम कोहली एवढ्या धावा

केपटाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात काल अनेक विक्रम झाले. परंतु दक्षिण आफ्रिका संघासाठी काल अनेक विक्रम झाले जे दक्षिण आफ्रिका संघ विसरणेच पसंत करेल.

भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेवर तर महिला संघानेही दक्षिण आफ्रिकेतच दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाने १२४ धावांनी तर महिला संघाने १७८ धावांनी हे विजय मिळवले.

विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने काल सर्वबाद १२४ तर पुरुष संघाने सर्वबाद १७९ धावा केल्या. या दोन्ही धावसंख्येचा बेरीज बरोबर ३०३ होते. काल प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम कोहलीने ५० षटकांत बरोबर ३०३ धावा केल्या.

यामुळे दक्षिण आफ्रिका संघावर सोशल माध्यमांवर सध्या जोरदार जोक्स फिरत आहेत.