सचिनच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी खास निमंत्रण पत्रिका

सचिन अ बिलियन ड्रीम हा चित्रपट दिनांक २६ मे २०१६ रोजी सर्वत्र प्रदर्शित जरी होणार असेल तरी त्याचा प्रीमियर आज पीव्हीआर, अंधेरी मुंबई येथे होणार आहे. त्यासाठी येणाऱ्या विविध क्षेत्रातील दिग्गजांसाठी सचिनने खास निमंत्रण पत्रिका बनवली आहे.

या निमंत्रण पत्रिकेसाठी खास एक बॉक्स बनवण्यात आला आहे. त्यात निमंत्रण पत्रिका, सचिनचा एक फोटो आणि बॅट अश्या गोष्टी आहेत. तसेच या बॅटवर मास्टर ब्लास्टरने स्वतः सही केलेली आहे.

या निमंत्रण पत्रिकेची छायाचित्र कालपासून विविध सोशल मेडियावर फिरत आहे. याबद्दल बॉलीवूडमधील विविध दिग्गजांनी ट्विट सुद्धा केले आहेत. त्यात गायिका श्रेया घोषाल, अभिनेता रणवीर सिंग, शंकर महादेवन, अतुल कसबेकर, अदिती राव हैदर, रणदीप हुडा यांचा समावेश आहे. तसेच पीव्हीआर, अंधेरी मुंबई हे खास या प्रीमियर साठी सज्ज झाले आहे.