सचिन आणि वाद…

क्रिकेटचा दैवत म्हणून जगभरात प्रसिद्ध असेलला भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर हा तसा तर खूप सौम्य स्वभावाचा आणि शांत वृत्तीचा माणूस. त्यामुळे तोच जास्त वाद्यांच्या भवऱ्यात कधी सापडला नाही , पण याचा अर्थ आसानाही की सचिन बरोबर कधी वाद झालेच नाहीत. पाहुयात सचिन आणि त्याच्या बरोबर झालेले काही वाद….

सचिनची फरारी

सचिनने जेव्हा डॉन ब्रॅडमन यांचा २९ कसोटी शतकांचा विक्रम मोडला तेव्हा फियाट इंडिया या कंपनीने सचिनला फरारी भेट म्हणून दिली. त्यावर कर लावणे सरकारला गरजेचे होते पण त्यावेळचे अर्थमंत्री जयवंत सिंग यांनी तो कर माफ केला.हे नियमांच्या विरूद्ध होत आणि या विरुद्ध दिल्ली न्यायालयात अपीलही करण्यात आली होती. हा मुद्दा मीडियाने खूप उचलून धरला. त्यानंतर फियाट इंडियाने हा कर भरला .

सचिनचे घर

सचिनकडे त्याच्या बांद्रामधील घरात राहण्यासाठी लागणारी बॉम्बे मुनसिपाल कॉर्पोरेशनची परवानगी नव्हती . कब्जा प्रमाणपत्राशिवाय राहायला गेल्यामुळे त्याला ४. ७५ लाख रुपयाचा दंड भरावा लागला होता . असाच वाद त्याच्या घरी बनवलेल्या जिममुळेही झाला.

सचिनने केली होती का चेंडूशी छेडछाड?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये झालेल्या कसोटी सामान्यमध्ये सचिनवर चेंडू बरोबर छेडछाड केल्याचा आरोप सामन्याचे रेफ्री माइक डेनिस यांनी केली होती, या वरून सचिनला १ सामन्याची बंदीही घालण्यात आली होती. मीडियाकडून या गोष्टीचा निषेध केला गेला होता.

सचिन आणि भारताचा झेंडा

२००७च्या विश्वचषकाच्या आधी भारतीय संघ जमैकामध्ये होता आणि तेथील भारतीय दूतावासात एका कार्यक्रमात सचिनने भारताचा झेंडा असेलला केक कापला. या विरुद्ध इंदोरच्या न्यायालयात सचिनवर केसदाखल करण्यात आली होती.

सचिन आणि बाळासाहेब ठाकरे

“मुंबई हा भारताचा भाग आहे आणि मी आधी एक भारतीय आहे आणि नंतर एक मुंबईकर ” हे सचिनचे वाक्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रुचले नाही आणि त्यांनी सचिनला राजकारणी वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला .

 

मंकीगेट प्रकरण

सायमंड्सला मंकी बोलण्याचा आणि वर्णभेद केल्याचा आरोप हरभजनवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट केला होता आणि त्याला साक्ष रिकी पॉईंटिंग आणि हेडन यांनी दिली आणि हरभजनला ३ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती पण तेव्हा सचिनने हरभजनच्या बाजूने साक्ष दिली आणि त्याला वाचवले . त्यामुळे सचिनने खोट बोलल्याचा आरोप झाला होता.

 

विनोद कांबळी आणि सचिन

सचिनचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी यांनी लहानपणी क्रिकेट एकत्रच सुरू केले एकाने क्रिकटचा देवता ही पदवी मिळवली तर दुसरा चांगली कारकीर्द बनवण्यातही अपयशी ठरला. सच का सामना या हिंदी मालिकेत विनोद कांबळीला प्रश्न विचारण्यात आला होता कि सचिन तुला बरबाद होण्यापासून वाचवू शकत होता का ? या प्रश्नच उत्तर त्याने होकार अर्थी दिले आणि लायडिटेक्टरने हि या प्रश्नला हिरवा कंदील दाखवला .

 

सचिन आणि शोएब अख्तर

“सचिन हा चांगला फलंदाज आहे आपण तो सामने जिंकून देणारा खेळाडू नाही ” या अख्तरच्या आत्मचरित्रातातील ओळीमुळे सर्व भारतातील क्रिकेट रसिक त्याच्यावर चिडले. यावर उत्तर देणे पण मी गरजेचे समजत नाही असे सचिन बोलला होता .

लेखक- आकाश खराडे
( टीम महा स्पोर्ट्स )

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)