सचिनचा 100 एमबी अँप लवकरच येणार तुमच्या स्मार्ट फोनवर…

सचिनने आपल्या चाहत्यानंसाठी ‘100 एम बी ‘ नावाचा अँप लाँच करायचे ठरवले आहे. हा अँप गुरुवारी लाँच होणार असून याच अँपसाठी त्याने सोनू निगम सोबत त्याने एक गाणं ही रेकॉरेड केलं आहे.

या अँपच नाव 100 एमबी ठेवण्यामागील कारण म्हणजे १00 मास्टर ब्लास्टर असा त्याचा अर्थ आहे. मास्टर ब्लास्टर ही पदवी सचिनने आपल्या 24 वर्षाच्या कारकीर्दीत कामवाली आहे .गुरुवारी ह्या अँपचा उदघाटन सोहळा मुबंईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये होणार आहे.

या अँप बदल बोलताना सचिन म्हणाला ” माझ्या सर्व चाहत्यांना माझ्या अजून जवळ येण्यासाठी हा अँप एका मंचाच काम करेल. मी माझ्या आयुष्यात जे काही करतो मग ते सोशल मीडियावर असो व खरया आयुष्यात असो , या अँपवर सगळं काही असेल”. सचिन याआधीच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर या सोशल माध्यमांवर अक्टिव आहे. तसेच गेल्याच महिन्यात त्याने लिंक्डइन या प्रोफेशनल नेटवर्किंग साईटवरही आपली प्रोफाइल सुरु केली आहे.