२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एमएस धोनी बढती घेण्यामागे सचिन तेंडुलकर!

2011 विश्वचषकाच्यावेळी कॅप्टन कूल एमएस धोनीने बढती घेऊन 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याच्या बढती घेण्यामागच्या कारणांची अनेकदा चर्चा केली जाते.

पण त्याच्या या बढतीचा निर्णय खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतला होता, याचा खुलासा वीरेंद्र सेहवागने केला आहे. ‘व्हॉट द डक’ या शोमध्ये सचिन आणि सेहवागची विक्रम साठे मुलाखत घेत होते. या मुलाखती दरम्यान 2011 च्या विश्वचषकाच्या आठवणी सांगताना सेहवागने धोनीच्या बढती घेण्यामागचे कारणही सांगितले आहे.

याबद्दल सेहवागने म्हणाला, “जेव्हा विराट आणि गंभीर फलंदाजी करत होते, तेव्हा सचिनने धोनीला सांगितले की जर उजव्या हाताचा फलंदाज बाद झाला तर उजव्या हाताचाच फलंदाज किंवा जर डाव्या हाताचा फलंदाज बाद झाला तर डावकरी फलंदाज फलंदाजीसाठी जाईल.”

“त्यानंतर काहीवेळाने विराट बाद झाला त्यामुळे युवराज सिंगने जरी जास्त धावा केल्या असल्या तरी धोनी फलंदाजीसाठी गेला.त्यानंतरचा निकाल तर सर्वांसमोरच आहे.”

यानंतर सेहवागने गमतीने असेही सांगितले की ” यावेळी पहिल्यांदाच सचिनने धोनीला थेट संदेश दिला होता.”

या सामन्यात धोनीने नाबाद 91 धावा करत भारताला 2011 चा विश्वचषक मिळवून दिला होता. हा विश्वचषक सचिन तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक ठरला.

क्रिकेटवरील “मुंबई क्रिकेट सफरनामा ” लेखमालिकेतील काही खास लेख-

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

– मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट

वाचा-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज