Video: सचिन तेंडुलकरची पुन्हा चिडचिड, दिला दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा सल्ला

मास्टर ब्लास्टर हा त्याच्या सामाजिक कामांसाठीही मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. सचिन हेल्मेटबद्दल जनजागृती व्हावी म्हणून सतत ट्विटर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विडिओ शेअर करत असतो.
यापूर्वी ह्या महान खेळाडूने स्वच्छ भारत कार्यक्रमात भाग घेतला होता.

भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात त्याने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा संदेश दिला आहे. सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवासात सुरक्षितता बाळगणे महत्वाचे झाले आहे.

ही सुरक्षितता बाळगण्याबद्दल सचिनने व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये सचिन त्याच्या कारमध्ये बसला होता आणि शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी ज्यांनी हेल्मेट घातले आहे त्यांचे कौतुक करत होता.

त्याचबरोबर दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यांनीही हेल्मेट घातले पाहिजे असे दुचाकीस्वारांना सांगत होता. कारण जर चालवणाऱ्याला दुखापत होऊ शकते तर त्याच्या मागे बसणाऱ्यालाही होऊ शकते म्हणून दोघांनीही हेल्मेट घालणे गरजेचे आहे असा संदेश त्याने दिला.

यापूर्वीही मास्टर ब्लास्टरने असाच एक विडिओ शेअर केला होता.

हे सर्व करताना सचिनने स्वतः मात्र चारचाकीमधील सीटबेल्ट मात्र लावलेला दिसत नाही.

Video: