पहा विडीओ- क्रिकेट प्रेमापोटी मास्टर ब्लास्टर थेट रस्त्यावर

मुंबई| भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरला सर्वांनीच मैदानावर तूफानी फलंदाजी करताना पाहीले आहे. पण त्याला रस्त्यावर फलंदाजी करताना क्वचितच पहायला मिळाले आहे.

असाच सचिनचा एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे हे माहित नसले तरीही या व्हिडीओने सोशल मीडियावर मात्र सर्वांची मने जिंकली आहेत.

या व्हिडीओमध्ये सचिन विलेपार्लेमधील दयालदास  रस्त्यावर क्रिकेट खेळत आहे. यात त्याने स्टंप्स म्हणून वाहतूकासाठी असलेले बॅरिकेट्स वापरले आहेत.

तसेच तो ज्या रस्त्यावर क्रिकेट खेळत आहे, तिथे मेट्रोचे काम चालू असल्याचेही दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावर वाहनांची वर्दळही आहे. या वाहनांमधून सचिनच्या चहात्यांचा ‘सचिन सचिन’ असा आवाज येत आहे. तसेच यात सचिन कॅज्यूअल्स कपड्यांमध्ये आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो.  त्याने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. सचिनने त्याच्या काराकिर्दीत 100 शतकांसह 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या आहेत.