तब्बल दोन वर्षींपुर्वी केलेली सचिनची ती भविष्यवाणी अखेर खरी ठरली!

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता जिवनाचा आनंद घेत आहे. सचिनचा जिवनाची दुसरी इनिंगही जोरात सुरू आहे. 

दुसऱ्या इनिंगमध्येही सचिन तसा खेळांपासून फारसा दूर गेलेला नाही.  तो सतत खेळाबद्दल सोशल माध्यमांवर भाष्य करत असतो. 

कोणत्याही खेळाडूने पदक जिंकले अथवा चांगली कामगिरी केली तर त्या खेळाडूचा हुरूप वाढावा म्हणून हा दिग्गज माजी कर्णधार सोशल माध्यमांवर लिहीत असतो. 

असंच तब्बल दोन वर्षांपुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं करणाऱ्या या खेळाडूने एक भविष्यवाणी केली होती. किदांबी श्रीकांत हा जागतिक क्रमावारीत अव्वल स्थानी येईल असे सचिन तब्बल २ वर्षांपुर्वी हैद्राबाद येथे म्हटला होता. 

विशेष म्हणजे बरोबर दोन वर्षांनी भारताचा प्रतिभावान खेळाडू किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आलाचं

याची आठवण आज विक्रम साठ्ये यांनी सचिनला ट्विटरच्या माध्यमातून करून दिली. कारण होत सचिनने किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाल्याबद्दल केलेलं शुभेच्छांचं ट्विट. 

हेही जाणून घेणं महत्वाचं-

बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. 

त्याने डेन्मार्कच्या विक्टर अॅक्सेलनला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली. आज BWF ही जागतिक क्रमवारी घोषीत केली. 

किदांबी श्रीकांत हा पहिला भारतीय पुरूष खेळाडू आहे जो BWF क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. यापुर्वी महिलांमध्ये अव्वल स्थानी विराजमान होण्याचा मान साईना नेहवालला मिळाला होताय ती मार्च महिन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आली होती. प्रकाश पदूकोणही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आले होते परंतू तेव्हा ही क्रमवारीची पद्धत नव्हती.  

किदांबी श्रीकांतने २०१७मध्ये चार सुपर सिरीज जिंकल्या होत्याय त्यात इंडोनेशिया, आॅस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्राॅंन्स ओपनचा समावेश आहे. 

तो २ नोव्हेंबर महिन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी गेला होता. विक्टर अॅक्सेलनने जागतिक चॅंपियनशिप जिंकत ७७१३० गुणांची क्रमवारी गाठली होती. यावर्षा मलेशियन ओपन स्पर्धा एप्रिल महिन्यात झाली नाही आणि विक्टर अॅक्सेलन गेल्या वर्षी ४ ते ९ एप्रिल महिन्यात या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गेला होता. यावर्षी ही स्पर्धा जून-जूलै महिन्यात होणार आहेय याचा मोठा फटका अॅक्सेलनला बसला. 

श्रीकांतने सांघिक प्रकारात भारताला राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे तर पुरूष एकेरीत तो उपांत्यपुर्व फेरीत पोहचला आहे. त्याचे सद्या ७६,८९५ गुण झाले आहेत.