सूरमा चित्रपट पाहिल्यावर मास्टर ब्लास्टर सचिनकडून संदीप सिंगवर कौतूकाचा वर्षाव

भारतीय हॉकीपटू संदिप सिंगच्या जिवनावर आधारीत सूरमा हा चित्रपट उद्या शुक्रवारी (१३ जुलै) प्रदर्शीत होत आहे.

आज गुरवारी (१२ जुलै) मुंबईमध्ये सूरमा चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहित क्रिडा क्षत्रातिल दिग्गज उपस्थित होते. या स्पेशल स्क्रीनिंगला सचिन तेंडुलकर बरोबर त्याची पत्नी अंजली आणि मुलगी साराही उपस्थित होती.

हा चित्रपट पाहिल्या नंतर सचिनने ट्विट करुन हॉकीपटू संदिप सिंगचे कौतुक केले.

“संदीप सिंगच्या भारतीय हॉकी संघाकडून खेळण्याच्या जिद्दिला माझा सलाम. हि रियल स्टोरी रिलमध्ये उत्कृष्ठपणे साकरली आहे. ‘सूरमा’ पाहून आनंद झाला.” सूरमा चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग पाहिल्यानंतर सचिनने या शब्दात संदीप सिंगविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

भारताचे हॉकीपटू संदीप सिंग यांना २००६ साली शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेमध्ये चूकून गोळी लागली होती. त्यानंतर दोन वर्ष ते चालू शकत नव्हते.

या अपघातानंतर संदीप सिंग यांची हॉकी कारकिर्द जवळपास संपुष्टात आली होती. मात्र संदीप सिंग यांनी त्यांच्या प्रबळ  इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय हॉकी संघात दमदार पुनरागमन करत भारताला अनेक पदके जिंकून दिली.

संदीप सिंग यांच्या हॉकीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना २०१० साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोलकाता नाईट रायडर्सने केली मोठी घोषणा, हा खेळाडू आपल्या ताफ्यात

-पहा विडीओ- अखेर विरेंद्र सेहवागला सापडला लिओनेल मेस्सीचा चाचा