मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा सहावा भारतीय

आयसीसीने भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा यावर्षीच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. त्याच्याबरोबर यावर्षी आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलेन डोनल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी दिग्गज महिला क्रिकेटपटू कॅथरिन फिट्झपॅट्रिक यांचाही ऑल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.

गुरुवारी आयोजित केलेल्या आयसीसीच्या एका सोहळ्यात या तीन दिग्गजांना हा हॉल ऑफ फेम सन्मान देण्यात आला. क्रिकेटमधील अनेक विश्वविक्रम नावावर असलेला मास्टर ब्लास्टर सचिन या सोहळ्यात म्हणाला, ‘माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे.’

तसेच सचिनने यावेळी त्याचे गुरु रमाकांत आचरेकर, त्याचे आई-वडील, पत्नी अंजली, भाऊ अजित यांचे त्याला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर त्याने बीसीसीआय, एमसीए आणि त्याच्या सर्व कर्णधारांचेही आभार मानले. पुढे तो म्हणाला, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे असे कौतुक केल्याबद्दल आयसीसीचेही आभार.

सचिन हा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा एकूण सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी बिशन सिंग बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या दिग्गज भारतीयांना हा सन्मान मिळाला आहे.

तब्बल दोन दशके क्रिकेट खेळणारा सचिन वनडे आणि कसोटीमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने 463 वनडे सामन्यात 18226 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 49 शतकांचा आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 200 कसोटी सामने खेळताना 15921 धावा केल्या असून यात त्याच्या 51 शतकांचा आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याचबरोबर 52 वर्षीय डोनल्ड यांनी त्यांच्या कारकिर्दीत 330 कसोटी विकेट्स आणि 272 वनडे विकेट्स घेतले आहेत. ते वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आहेत.

तसेच याच्याबरोबर हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेल्या कॅथरिनने वनडेमध्ये 180 आणि कसोटीमध्ये 60 विकेट्स घेतले आहेत.  तिचा 1997 आणि 2005 या महिला विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघातही समावेश होता.

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश असणारे भारतीय – 

2009 – बिशन सिंग बेदी

2009 – सुनील गावसकर

2010 – कपिल देव

2015 – अनिल कुंबळे

2018 – राहुल द्रविड

2019 – सचिन तेंडुलकर

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा होणे नाही..

भारताची धावपटू हिमा दासने १५ दिवसात जिंकले चौथे सुवर्णपदक

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक आता आयपीएलच्या या संघाला करणार मार्गदर्शन