जर सचिन क्रिकेटचा देव असेल तर धोनी क्रिकेटचा बादशहा आहे

एशिया कप 2018 मध्ये भारत आणि हाॅंगकाॅंग यांच्यात झालेल्या सामन्यात  फिरकी गोलंदाज एहसान खानचे एक स्वप्न पुर्ण झाले. त्याने भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीला बाद करत स्वप्नपुर्ती केली होती.
एहसान खानने त्याचे भविष्यात नियोजन स्पष्ट करताना सांगितले की ”आपण एक पुस्तक लिहीणार असून आणि त्या पुस्तकातील एक धडा किंग आॅफ द क्रिकेट हा महेंद्रसिंग धोनीशी संबधीत असणार आहे”.
”जर सचिन क्रिकेटचा देव असेल तर धोनी हा क्रिकेटचा बादशाह आहे. मी माझ्या जीवनावर आधारीत पुस्तक लिहणार आहे. त्यात धोनीचा एक धडा असणार आहे”. असे त्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
एहसान खानने 15 वन-डे सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत. त्याला सचिन तेंडूलकरची विकेट घ्यायची होती. मात्र तो निवृत्त झाल्याने ते करणे त्याला आता शक्य होणार नसल्याने त्याला दुख: झाले आहे.
”सचिनला बाद करू नाही शकलो याचे दुख: आहे. धोनीची विकेट मिळाली याचा मला मनस्वी आनंद झाला अाहे”. असेही एहसान म्हणाला.
धोनीचा एशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरूद्धचा सामना कर्णधार म्हणून 200 वा सामना होता. असा पराक्रम करणारा तो जगातील तिसराच कर्णधार ठरला आहे.
 महत्वाच्या बातम्या-