सचिनचा असा फॅन पाहिलाय का?

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज ट्विटरवर एक खास विडिओ शेअर केला आहे ज्यात केबीसीमध्ये भाग घेतलेला तो व्यक्ती सचिनवर किती प्रेम करतो याचा तो विडिओ आहे.

राजूदास राठोड असे त्या चाहत्यांचे नाव असून तो मोठा सचिन प्रेमी आहे. या विडिओमध्ये अमिताभ बच्चन त्या चाहत्याला एक प्रश्न विचारतात. त्यावर राठोड म्हणतात, ” मला १९९६ पासून चांगलं क्रिकेट समजतं. तेव्हापासून मी सचिनचा एकही सामना सोडला नाही. मी सचिन जेव्हा शतक करतो तेव्हा पुढचे दोन-तीन दिवस आंनदी राहायचो. तर तो ९९ धावांवर किंवा लवकर बाद झाला तर मला खूप वाईट वाटायचे. मी सचिन ज्या सामन्यात खेळत असे त्या सामन्याला एक तास आधीच टीव्ही समोर बसत असे. “

हा चाहता पुढे म्हणतो, ” मी प्रत्येक चेंडूवर सचिनचं स्वागत करत असे. सचिन एवढा आनंद आणि दुःख मला आजपर्यत कुणीच दिल नाही. माझी मुलगी जेव्हा कार्टून पाहायची तेव्हा मी अनेक वेळा रिमोट फोडला आहे. “

यावर मास्टर ब्लास्टरने एक खास प्रतिक्रिया दिली आहे. ” राजूदास राठोड आपण केबीसीमध्ये छान खेळलात. तुमच्या गप्पा ऐकून मजा आली. मला विश्वास आहे की तुम्ही पुन्हा रिमोट फोडणार नाही. आपण लवकरच भेटू. “

सचिनच्या या ट्विटला तब्बल १ हजार रिट्विट आणि १० हजार लाइक्स फक्त ४ तासात आल्या आहेत.