Video: आजही वानखेडेत सचिन-सचिन असाच जयघोष होतो

मुंबई । भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या वनडेत न्यूजीलँड संघाने भारतीय संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. हा सामना अनेक अर्थानी लक्षात यासाठी राहणार आहे कारण या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने विक्रमी ३१वे शतक करत रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला.

असे असले तरी या मैदानावर आजही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाने घोषणा देणारे असंख्य सचिनप्रेमी येतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच मैदानावर आपला २००वा कसोटी सामना खेळताना नोव्हेंबर २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

त्यानंतर वानखेडेवर भारतीय संघ ४ आंतरराष्ट्रीय सामने खेळला. परंतु या सामन्यात एक खास गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे मुंबईकरांचे सचिनवरील प्रेम. प्रत्येक सामन्यात संघ कोणताही जिंको किंवा हिरो घोषणा मात्र सचिनच्या नावानेच होत होत्या.

काल देखील मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावाने चाहत्यांनी सचिन-सचिन घोषणा दिल्या. त्याचे अनेक विडिओ आज सोशल मीडिया वेबसाईटवर व्हायरल होत आहेत.

असे प्रेम या मैदनावर खूप कमी खेळाडूंना मिळाले आहे. कालच्या सामन्यात कोहली-कोहली आणि धोनी-धोनी याही घोषणा पाहायला मिळाल्या. परंतु सचिन-सचिन घोषणा सचिनने निवृत्ती घेतल्यावर होणे ही मोठी गोष्ट आहे.

सचिनने या मैदानावर एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात ४६च्या सरासरीने १३७६ धावा केल्या असून त्यात ११ अर्धशतके आहे २ शतकांचा समावेश आहे. १९९३ साली सचिन या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.