लग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला

भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांचा शुक्रवारी(14 डिसेंबर) विवाह सोहळा पार पडला. याबद्दल अनेक मान्यवरांनी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना सचिनकडून मोठी चूक घडली. त्याने सायना आणि कश्यपला शुभेच्छा तर दिल्या पण फोटो मात्र सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतचा पोस्ट केला होता. यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

Photo Courtesy: Screengrab/Twitter/sachin_rt

पण ही चूक लक्षात येताच त्याने तो ट्विट डिलीट केला आणि पुन्हा सायना आणि कश्यपचा फोटो पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शुभेच्छा देताना म्हटले आहे की, ‘अभिनंदन आणि तूम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तूमच्या आयुष्यातील ही सर्वोत्तम भागीदारी असो.’

सायना आणि कश्यप हे 2005 च्या दरम्यान प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असताना भेटले होते. गोपिचंद यांच्या अॅकॅडमीमध्ये हे दोघेही एकत्र सराव करायचे.

त्यांचे लग्न काही निवडक कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडले असून हैद्राबादमध्ये 16 डिसेंबरला रिसेप्शन पार पडणार आहे. त्यांच्या या विवाहाविषयी सायना आणि कश्यप या दोघांनीही ट्विटरवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सायना-कश्यपप्रमाणे क्रिडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे. यात स्क्वॅशपटू दिपिका पल्लीकल आणि क्रिकेटपटू दिनेश कार्तिक, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंग, कुस्तीपटू गीता फोगाट आणि पवन कुमार, साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियां अशा खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच बॅडमिंटनमध्ये सिक्की रेड्डी आणि सुमित रेड्डी,  प्रणव जेरी चोप्रा आणि प्रज्ञा गद्रे, मधुमिता गोस्वामी आणि विक्रम सिंग बिश्त, सईद मोदी आणि अमिता कुलकर्णी या जोड्यांचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

निवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव

सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!