मास्टर ब्लास्टर सचिनने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सचिनने २६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या ‘ सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाबद्दल माहिती सांगितली. तसेच पंतप्रधान मोदींचे आशीर्वादही घेतले.

यावेळी सचिनची पत्नी अंजलीही उपस्थित होती.

सचिनने यावेळी चित्रपटातील काही महत्वाच्या गोष्टी पंतप्रधान मोदींना सांगितल्या. यावेळी मोदींनी चित्रपटाचं कौतुक करताना सकारात्मकता दर्शविली.

यावेळी सचिन आणि पंतप्रधान मोदींनी भेटीची माहिती ट्विटरवर शेअर केली.

सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट जेम्स एर्स्कीने यांनी दिग्दर्शित केलेला असून त्यात सचिनच्या बालपणापासून ते महान खेळाडू होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. केरळ आणि छत्तीसगढमध्ये हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच टॅक्स फ्री केला आहे.